Breaking News

बामणडोंगरीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून खेळाडूंचा सन्मान; मंदिरासाठी पाच लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात हनुमान जन्मोत्सव गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त बामणडोंगरी येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते रायगडसह ठाणे जिल्ह्यात झालेल्या विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या बामणडोंगरीतील जीवदानी स्पोर्ट्सच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
बामणडोंगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. या ठिकाणी जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व हरिपाठ मंडळ यांच्या वतीने 1 ते 5 एप्रिलदरम्यान भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच गुरुवारी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत हनुमानाचे दर्शन घेतेले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी बामणडोंगरीतील हनुमान मंदिरासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक देणगी जाहीर केली.
देशातील सर्वांत मोठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील चषक 2023 ग्रामीण क्रिकेट स्पर्धा भिवंडीतील अंजुर येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत बामणडोंगरीच्या जीवदानी स्पोर्ट्स संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. या संघातील खेळाडूंना पारितोषिक स्वरूपात 11 टू व्हिलर बाईकही मिळाल्या. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सर्व खेळाडूंचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता संघातील 20 खेळाडूंना प्रत्येकी पाच हजार आणि बामणडोंगरी रत्न असलेल्या तीन खेळाडूंना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमास काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी जि. प. सदस्य रवींद्र पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप उलवे नोड 1 सरचिटणीस अंकुश ठाकूर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य सदस्य गीता ठाकूर, योगिता नाईक, सदस्य वितेश म्हात्रे, भाजपचे बामनडोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, दीपक गोंधळी, नामदेव ठाकूर, सुहास गोंधळी, नाना गडकरी, प्रकाश ठाकूर, अरुण नाईक, प्रितम नाईक, अरुण नाईक, कामगार नेते रवी नाईक, अश्विन नाईक, चंद्रकात महात्रे, प्रकाश म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमान मंदिरासाठी तसेच खेळाडूंना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल बामणडोंगरी ग्रामस्थांनी तसेच जीवदानी स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply