Wednesday , February 8 2023
Breaking News

भारत, इंग्लंड विश्वचषकाचे दावेदार : गिब्स

केपटाऊन : वृत्तसंस्था

आयसीसी विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार कोण असेल, याबाबत क्रिकेटमधील जाणकारांपासून  क्रिकेटप्रेमींपर्यंत प्रत्येक जण आपले मत व्यक्त करीत आहे. अनेकांनी भारताला या स्पर्धेसाठी प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले आहे. यात आता दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्सचीही भर पडली आहे. त्याने भारतासह इंग्लंड हा संघदेखील विजेतेपदाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे.

गिब्स मुलाखतीत म्हणाला की, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असू शकतात, तसेच हे दोन संघ किमान उपांत्य फेरी गाठतीलच, असेही त्याने म्हटले आहे, मात्र उपांत्य फेरीतील इतर दोन संघ कोणते असतील याबाबत अंदाज त्याने व्यक्त केला नाही. त्यामुळे चुरस असेल.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply