Breaking News

कामोठ्यातील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुविधा

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील क्रिटीकेअर लाइफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून आधुनिक कॅथलॅबचा उद्घाटन सोहळा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आला.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कामोठ्यातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक कॅथलॅब ही लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे आणि क्रिटीकेअर लाइफलाइन हॉस्पिटल गेली तीन वर्ष नागरिकांना उत्तम सुविधा देत आहे.

कॅथलॅबच्या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, भटके विमुक्त आघाडीच्या महिलाध्यक्षा विद्या तामखडे, युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, डॉ. संतोष राठी, डॉ. मुकेश उदानी, डॉ. गोपाल राठी, संदीप कोठारी, कमल जाखोतीया आदी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply