पनवेल : रामप्रहर वृत्त
पुन्हा आणूया आपले सरकार! या शीर्षकाखाली भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनास बूथमधील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.