Breaking News

जिते सरपंचासह असंख्य कार्यकर्ते भाजपत

गावच्या विकासकामातून कायापालट करणार : जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील
पेण : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी व हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत जिते ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर व जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे पेण तालुक्यात भाजपची ताकद वाढली असल्याने या जिते विभागात विकास कामांनाही वेग मिळणार आहे. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सांगितल, जिते गावाचा मागील बॅकलॉग भरून काढून आगामी काळात जिते विभागात विकासाची गंगा आणली जाईल. तसेच विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. प्रवेश करणार्‍या सर्वांचे भाजपमध्ये सन्मान दिला जाईल असे सांगितले.आमदार रवीशेठ पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील हेच विकास काम करून जिते गावाचा कायापालट करू शकतात यामुळेच जिते सरपंच व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे लिलाधर म्हात्रे यांनी सांगितले.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लिलाधर म्हात्रे, सरपंच सुप्रिया म्हात्रे, गोरख तांडेल, निलेश तांडेल, सलोनी लांडेल,भावेश तांडेल, निवेश तांडेल, हितेश तांडेल, कुणाल तांडेल, करण तांडेल,रूपेश ठाकूर, दिपेश ठाकूर, रोशन ठाकूर, अविशा ठाकूर, अलंकार ठाकूर, देवेंद्र म्हात्रे, ऋषी ठाकूर, सुरज तांडेल, स्वप्निल म्हात्रे, आकाश ठाकुर, शुभम म्हात्रे, संजय म्हात्रे, सौरभ म्हात्रे, नितीन ठाकूर, कल्पेश ठाकूर, निर्भय रसाळ, मानस म्हाजे, जयेश म्हात्रे आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply