Breaking News

स्वा. सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनी

गौरव यात्रेनिमित्त पनवेलमध्ये उपक्रम; विचारांचा जागर

पनवेल : रामप्रहर वृत्त
जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नवीन पिढी तयार करायची असेल तर तरुणांनी सावरकरांचे तेजस्वी विचार आत्मसात करायल हवे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या विचारांचा जागर करण्यासाठी पनवेल शहरात स्वातंत्रवीर विनायक दामोदार सावकरकर यांच्या जीवनावर आधारीत ‘चित्रप्रदर्शनी’ भरवण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे भाजपचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 8) उद्घाटन झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी ही गौरव यात्रा पनवेल महापालिका क्षेत्रात होणार आहे. या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना व सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून पनवेल शहरातील सावरकर चौकात स्वातंत्रवीर विनायक दामोदार सावरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रप्रदर्शनी भरवण्यात
आली आहे. या प्रदर्शनीचे भाजपचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश सोमण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, प्रसाद खंदारे, अभिजित साखरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply