नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला 30 ते 40 च्या दरम्यान येऊ लागली असून करोनाबाधितांनी काळजीपूर्वक रित्या 5 दिवसाच्या विलगीकरणात राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने कार्यवाहीचे निर्देश पालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार करोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून सरासरी दिवसाला 2 हजार चाचण्या केल्या जात आहेत.
नवी मुंबई शहरात सर्दी, खोकला व तापावरील उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात अथवा नागरी आरोग्य केंद्रात येणा-या लक्षणे असलेल्या आजारी व्यक्तींची करोना चाचणी करण्यात येत असून आयएलआर आणि सारी रुग्णांचीही करोना चाचणी करण्यात येत आहे. पालिका क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिकेची 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व 4 रुग्णालये या ठिकाणी करोना चाचण्या केल्या जात असून नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयातील आरटी-पीसीआर प्रयोगशाळा 24 तास पूर्ण क्षमतेने कार्यांन्वित आहे. या ठिकाणाहून आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट 24 तासाच्या आत संबधित व्यक्तीस एसएमएस संदेशाव्दारे लिंक पाठवून उपलब्ध करून दिले जात असून करोना चाचणी सकारात्मक येणार्यां रुग्णांना 5 दिवसांचे गृहविलगीकरण सूचित करण्यात आले आहे.
करोना रुग्ण्संख्येची आसपासच्या शहरात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेने सतर्कता राखण्याची गरज लक्षात घ्यावी आणि टेस्टींगवर भर द्यावा व करोना प्रतिबंधात्मक पावले उचलावीत असे निर्देश सर्व वैदयकिय अधिका-यांना देतानाच नागरिकांनीही करोना प्रतिबंधात्मक नियमांचे विशेषत्वाने गर्दीच्या ठिकाणी व रुग्णालयात जाताना पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Check Also
सरके चुनर… हटाव मोहीम सफल
गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …
RamPrahar – The Panvel Daily Paper