Breaking News

दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद

श्रीनगर ः वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये हा हल्ला करण्यात आलाय. यात तीन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

सुरक्षेवर असलेले पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला. अहद बाब चौकाजवळ असलेल्या नूरबाग परिसरात हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना तातडीने जवळच्या एसडीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका जवानाने नंतर प्राण सोडले, अशी प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात तीन निमलष्करी दलाचे जवानही जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. परिसराला घेरण्यात आले आहे, अशी माहिती सोपोरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

सीआरपीएफ जवानांवर हल्ले वाढले

पुलवामा जिल्ह्यातील नेवा भागातही शुक्रवारी सीआरपीएफ जवानांच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एका जवानाच्या पायला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. तर 7 एप्रिलाल अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. तर एक जखमी झाला होता.

Check Also

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित …

Leave a Reply