Breaking News

कामोठे येथे कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल, लॅपटॉप हॅक

जीवे मारण्याची अज्ञात हॅकरकडून धमकी; एकच खळबळ

पनवेल : वार्ताहर – अज्ञात हॅकरने कामोठे वसाहतीत राहणार्‍या एका कुटुंबीयांचे सर्व मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हॅक करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून या कुंटुंबाला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. कामोठे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी अ‍ॅक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

कामोठे सेक्टर-19 मध्ये कुटुंबासह राहणार्‍या एका कुटुंबातील अज्ञात हॅकर्सने त्यांचा घरातील तिन्ही मोबाइल फोन व घरातील दोन्ही लॅपटॉप हॅक केले आहेत. तसेच हॅक करण्यात आलेल्या मोबाइल फोनवरुन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना त्यांच्या नकळत मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. हॅकरकडून त्यांच्या घरातील तिन्ही मोबाइलवर एकमेकांना तसेच मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप, झुम मिटींग व गुगल मीट यासारख्या ऍफ्लिकेशन वरुन कुत्रा, इडीयट या सारखे मेसेजेस पाठविले जात आहेत. विशेष म्हणजे तक्रारदारांच्या दोन्ही मुलींचे ऑनलाइन क्लासेस सुरु असताना देखील त्यांच्या शिक्षकांना व मित्र मैत्रिणींना देखील घाणेरडे मसेजे पाठविले जात आहेत. त्यामुळे सध्या हे संपुर्ण कुटुंब त्रस्त झाले आहे. 

सुरुवातीला खबरदारीचा उपाय म्हणुन या कुटुंबाने सर्व मोबाइल फोन रिसेट मारले होते, तसेच फोनमधील सर्व अकाऊंट्सचे पासवर्ड बदलले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांच्या मोबाइलवरुन घाणेरडे मेसेज जाण्याचे प्रकार सुरुच राहिले. त्याचप्रमाणे गुगल मीट व झुम मिटींगच्या ऍफ्सवरुन तक्रारदाराच्या मुलींच्या शिक्षकांना पैशाची मागणी होऊ लागली. तसेच तक्रारदारांना शिवीगाळ करुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत.

मागील  दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply