पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे अहिंसक संप्रेषण: भावनिक आरोग्याचा मार्ग या विषयावर अतिथी व्याख्यान बुधवार दि. 19 एप्रिल 2023 रोजी 10:00 वाजता आयोजित केले होते.
या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे एम. डी.( कम्यूनटि मेडिसीन) डॉ. दिपक पाटील आणि सहाय्यक संसाधन व्यक्ती म्हणून सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी डेरे(पाटील) उपस्थीत होते. या व्याखानासाठी विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, कला शाखेचे प्रमुख डॉ. बी. एस. पाटील , रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर , विज्ञान संघटनेचे प्रमुख प्रा. जी. एस. साठे व प्रज्ञा परिसर प्रकल्पच्या नोडल अधिकारी सौ. स्वाती परब यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.
महाविद्यालयाचे कला शाखेचे प्रमुख डॉ. बी. एस. पाटील यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या नंतर विज्ञान विभागाची विद्यार्थिनी आर्ची पटेल हिने प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना इंग्रजी शाखा प्रमुख डॉ.आर.व्ही. येवले यांनी केली.
प्रमुख पाहुणे डॉ. दिपक पाटील यांनी अहिंसा संवादासाठी आपल्याला निरीक्षण, भावना व गरजा आवश्यक आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत असे सांगितले. त्यांनी या परिसंवादा मध्ये मला वाटते कारण मला गरज आहे , तुम्हाला वाटते कारण तुम्हाला गरज आहे असे विधान नमूद केले. तसेच वेगवेगळ्या भावना दर्शविण्यासाठी त्यांनी अभिनय सादर केला व संवादाचे वर्णन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले.
या व्याख्याना अंतर्गत प्रश्न उत्तर सत्र देखील घेण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली . विज्ञान संघटनेचे प्रमुख प्रा. जी. एस. साठे यांनी या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …