Breaking News

पनवेलमध्ये मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा

उरणमध्ये 3400 मुस्लीम बांधवांचा सहभाग
उरण ः वार्ताहर
मुस्लिम बांधवाां पवित्र सण रमजाननिमित्त पनवेल व उरणमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
उरणमधील जामा मस्जिद, मेमुदिया मदरसा खिडकोळी नाका, खाजा गरीब नवाज सुंनी हनफी येथे सुमारे 3400 मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.
उरण पोलीस ठाणे हद्दीत रमजान ईद सणानिमित्त सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) धनाजी क्षीरसागर व उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर व उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांनी मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अथर्व जाधवला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्तपरदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अथर्व हरीश जाधव याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply