उत्तर रायगड विभागाची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाच्या आढावा बैठकीसाठी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ रविवारी (दि. 23) पनवेलमध्ये येत आहेत. शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.
या बैठकीला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या प्रदेश संयोजिका वर्षा भोसले, जिल्हा समन्वयक संध्या शारबिद्रे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवर या वेळी चर्चा होणार आहे.
या बैठकीस सर्व सेलच्या महिला पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक व सहकार्यांनी केले आहे.