पनवेल ः वार्ताहर
मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद ईदनिमित्त तक्का परिसरातील मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रतीक बहिरा यांनी गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जात असून पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव ईद साजरी करताना दिसत आहेत. सकाळपासूनच तक्का परिसरात मशिदमध्ये नमाज अदा करून आलेल्या मुस्लिम बांधवाना भाजपचे युवा नेते प्रतीक देवचंद बहिरा यांनी गळाभेट करून ईद च्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …