Breaking News

कळंबोली मॅकडोनाल्डजवळ सध्या बेकायदा टपर्‍यांची उभारणी

कायमस्वरूपी कारवाई करण्याबाबत नागरिकांची मागणी

पनवेल : वार्ताहर
मुंबई-पुणे मार्गावर कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ सध्या बेकायदा टपर्‍या दिवसेंदिवस थाटल्या जात आहेत. या बेकायदा पद्धतीत सुरू असलेल्या धंद्याला कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने ते राजरोसपणे या मार्गावरील फुटपाथवर चायनीज, अंडापाव, वडापाव, भजी, समोसे, थंडपेय, सिगारेट, गुटखा आदी पदार्थांची विक्री करत आहेत.
या टपर्‍यांमुळे येथे दररोज अपघातांना व वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे. पनवेल महानगर पालिका अतिक्रमण विभाग यावरती थातूरमातूर कारवाई करत असल्याने परिसरातील नागरिकांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील कळंबोली व खारघर या दोन महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र बेकायदा पद्धतीत या दुकानांची उभारणी केली जात आहे. त्यामुळे या दुकानांवर या महामार्गावरून सुसाट प्रवास करणार्‍या गाड्या अचानक उभ्या केल्या जातात. तसेच कळंबोली येथील मॅक्डॉनाल्डसमोरील पुणे एक्स्प्रेस वेचा रस्ता खासगी वाहनांनी अडवला जात आहे, त्यामुळे येथे मोठा अपघात होण्या शक्यता निर्माण झाली आहे. संध्याकाळी व रात्रीच्या वेळी या भागात ट्रॅव्हल्स मोठ मोठे ट्रक या ठिकाणी उभे केले जातात. तसेच याच महामार्गावरून सुरू होणारा पुणे येथून कोल्हापूर, बंगळुरू जाणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग सुरू होतो.
यासाठी या मुख्य रस्त्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीमुळे अपघाताच्या घटना येथे वारंवार घडत आहेत, तर दुसरीकडे गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवाशांच्या खिशातील पैशाचे पाकीट चोरीला जात असल्याच्या घटना येथे वाढू लागल्या आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply