Breaking News

संदीप गुरव यांचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी

रायगड येथील दिव्यांग खेळाडू संदीप प्रल्हाद गुरव यांना व्हीलचेअर तलवारबाजी खेळात जागतिक स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) प्रदान करण्यात आला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर झालेल्या शानदार सोहळ्यात गुरव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले गेले.

या सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, क्रीडामंत्री विनोद तावडे, क्रीडा विभागाचे आयुक्त नरेंद्र सोपल, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव जय कवळी व इतर मान्यवर उपस्थित होते. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी संदीप यांचे वडील प्रल्हाद गुरव, आई रेखा गुरव, हेमंत गुरव, भरत गुरव यांच्यासह कुटुंबीय तसेच लगोरी संघटनेचे तुषार जाधव, विजय पालसकर, अनिता पवार, जयश्री-नागेश्री लिंगाणा, हेमंत पयेर, भारतीय तलवारबाजी संघटनेचे अशोक दुधारे, उदय डोंगरे व इतर पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply