मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर हे सोमवारी (दि. 22) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
महाराष्ट्रात सध्या राजकारणातील आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे, पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर केली.
पुढे ते म्हणाले की, प्रकारे पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत 100 कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून 2300 कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा करण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल आम्हाला वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की मंत्रिमंडळाच्या स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे, तसेच हा शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. या संबंधीचा रिपोर्ट राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू करणे गरजेचे आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …