Breaking News

नवी मुंबईतील शिवानीची सॉफ्टबॉल संघात निवड

नवी मुंबई : प्रतिनिधी

नागपूर येथील मनकापूरमधील जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित महिलांच्या 19 वयोगटातील सॉफ्टबॉल स्पर्धेत वाशी येथील शिवानी गायकवाड हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. शिवानी ही ओरियंटल सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी आहे. मलकापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये केरळ, हरियाणा, दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पाँडेचरी, सीबीएससी व महाराष्ट्र असे देशभरातून संघ आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला; तर सीबीएससी द्वितीय व केरळ संघ तृतीय क्रमांकावर राहिला. यात महाराष्ट्राकडून खेळताना नवी मुंबईच्या शिवानी गायकवाड हिने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. याबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब शिंदे, उपप्राचार्य आश्रा सौदागर, प्रा. विश्वास कदम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply