Breaking News

पोलादपूर तहसील कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या

पोलादपूर ः प्रतिनिधी
पोलादपूर तहसील कार्यालयात एका लिपिकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र व कामगार दिनी सोमवारी (दि. 1) ही घटना घडली.
राजेंद्र दत्तात्रेय केकाण (वय 32, पोलादपूर सह्याद्रीनगर, मूळ रा. खोकरमोह, ता. शिरूरकासार, जि. बीड) असे आत्महत्या करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव असून त्याने रात्री 12 ते पहाटे 6.45 या दरम्यान कार्यालयाच्या मधल्या पॅसेजमध्ये प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज म्हसकर व पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत हे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
दरम्यान, केकाण हे दिवसरात्र दारूच्या नशेत व मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त दिसून येत असत. अशातच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलादपूरचे प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply