मुंबई : प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील गरीब, गरजू व विधवा महिला लाभार्थ्यांना लघु व्यवसायाकरिता शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप आदी प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेषनिधी वाटप शनिवारी (दि. 13) सोमय्या मैदान, चुनाभट्टी येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथर शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 26,500 महिलांना या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या महिलांना पत्रक वाटप आणि प्रातिनिधिक स्वरूपातील साहित्य वाटप या वेळी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद सदस्य आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेच्या वतीने खासदार राहुल शेवाळे आणि श्रीमती शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …