Breaking News

टॅक्सी, रिक्षा संघटनांच्या नामफलकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल रेल्वे स्टेशन येथील जय हिंद ऑनलाईन रायगड जिल्हा टॅक्सी सर्व्हिस युनियन आणि नवनाथ नगर रिक्षा चालक मालक संघटना यांनी भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. या दोन्हींच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष व संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, शक्ती केंद्र प्रमुख जितेंद्र वाघमारे, जय हिंद ऑनलाईन टॅक्सी सर्व्हिस युनियनचे संस्थापक अब्दुल आलम, उपाध्यक्ष रवी गरड, नाका अध्यक्ष इम्रान मुजावर, खजिनदार दिलावर आलम, कार्याध्यक्ष तानाजी शिंदे, सदस्य आमिर आलम, राजू बोदडे, आकाश बोदडे, सुनील गुंजाळ, मोहन राठोड, प्रकाश गरड, सादिक शेख, अख्तर शेख, फारूक लाला सय्यद, कार्यकर्ते अशोक आंबेकर, राजू बगाटे, जरीना शेख, नंदा टापरे, शैला आंबेकर, संतोष अपसिंगेकर, जितेंद्र वाघमारे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सलमान पोपेरे, उपाध्यक्ष परशुराम चाकरी, सचिव शौकत शेख, खजिनदार कलीम शेख, नाका प्रमुख गोपाळ पत्हे, यांच्यासह टॅक्सी, रिक्षा मालक व चालक उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply