Friday , September 22 2023

नवीन पनवेलमध्ये एकाची निघृणपणे हत्या

पनवेल : वार्ताहर
अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीची कोणत्यातरी हत्याराने निघृण हत्याकरून सदर मृतदेह नाल्यात टाकून ते पसार झाल्याची घटना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
नवीन पनवेल उड्डाणपुलाखालील रेल्वेपटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यात अंबिकानगर सोसायटीजवळ एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना आढळून आहे. त्यांनी तत्काळ खांदेश्वर पोलिसांना याबाबत माहिती कळवली. खांदेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत सदर मृतदेह नाल्यातून बाहेर काढला असता त्याच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या डाव्या बाजूस उजव्या हाताच्या दंडावर व पार्श्वभागावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारले व त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगातील सर्व कपडे काढून त्याचा मृतदेह नवीन पनवेल उड्डाणपुलाखालील रेल्वेपटरीजवळ असलेल्या वाहत्या नाल्यात टाकून ते पसार झाले आहेत.
मयत व्यक्तीचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे असून तो रंगाने सावळा, अंगाने मजबूत, उंची 174 सेमी आहे. तसेच पायात काळे सॉक्स घातलेले आहे. या व्यक्तीबाबत किंवा घटनेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलीस ठाणे (022-27465338) किंवा महिला पोलीस निरीक्षक गलांडे मॅडम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply