Breaking News

सीकेटीत महिला दिन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 9) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. प्रा. वसंत बर्‍हाटे यांनी आधुनिक काळात महिलांचे सबलीकरण या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले व सर्व प्राध्यापिका आणि शिक्षकेतर महिला यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील  प्राध्यापिका अर्चना गांधारकर, शेरीन मॅथ्यु व मीनल भालेराव यांनी स्त्री जीवनावरील कवितांचे वाचन केले.

प्राचार्य मा. डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी सर्व महिलांचे मनापासून कौतुक केले. सुत्रसंचालन मीनल भालेराव यांनी व आभार प्रदर्शन डॉ. स्मिता भोईर

यांनी केले.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply