खोपोली ः प्रतिनिधी
पर्यावरण विभागाची मुदत संपुष्टात आल्यानंतरदेखील दगड खदान, क्रशर सुरू ठेवणार्या दहा दगड खाणींवर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशाने शनिवारी (दि. 27) कारवाई करण्यात आली. दगड खाणीला महसूल पथकाकडून टाळे ठोकण्यात आले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या दगड खाणीबद्दल अनेक तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल विभागाने धडक कारवाई करत तालुक्यातील दगड खाणीची तपासणी केली. तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी, तलाठी यांचे पथकाने दगड खाण तपासणी मोहीम राबवली. सुमारे दहा दगड खाणी पर्यावरण विभागाकडील ना हरकत मुदत संपल्यानंतरदेखील सुरू असल्याचे निदर्शनास आले. चौक मंडळातील तीन दगड खाणी, खालापूर मंडळातील सहा दगड खाणी व वावोशी मंडळातील एक दगड खाण सील करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या धडक कारवाईनंतर दगड खाणचालकांचे धाबे दणाणले आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper