Breaking News

पनवेल वडवलीतील अंतर्गत रस्ता होणार सुसाट

काँक्रिटीकरणाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 10 लाख रुपये खर्चून नांदगाव ग्रामपंचायत येथील वडवली गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) झाले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. त्या अंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून नांदगाव ग्रामपंचायत येथील वडवली गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण 10 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. या विकासकामाच्या भूमिपूजनावेळी नांदगाव सरपंच विजेता भोईर, उपसरपंच अर्चना पाटील, माजी सरपंच अविनाश उदार, अविनाश गायकर, नांदगाव सदस्य सखाराम ठाकूर, शिवराम पाटील, विक्रम फडके, कल्पेश पाटील, कुडावे बीजेपी अध्यक्ष विनायक पाटील, अविनाश पाटील, हरिश्चंद्र पाटील, विश्वास पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply