माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. अशा वेळी तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पक्ष, जनहित संवर्धक मंडळ, शिवसेना, राजे शिवराय प्रतिष्ठान, भारत विकास परिषद, कच्छ युवक संघ, रोटरी क्लब ऑफ पनवेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, एनएसएस पीजी मुंबई विद्यापीठ, ब्राह्मण सभा नवीन पनवेल, विश्व हिंदु परिषद, संस्कार भारती, सुधा साहित्य सामाजिक संस्था यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या सुरुवातीला मान्वरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या शिबिरात 100हून अधिक दात्यांनी रक्तदान केले.
या वेळी जनहित संवर्धन मंडळ सुहास सहस्त्रबुध्दे, प्रशांत कोळी, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप, अक्षया चितळे, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेख पटवर्धन, गणेश जगताप, स्मिता जोशी, अमरीश मोकल, अंजली इनामदार, प्रथमेश सोमण, अजय शिवराय प्रतिष्ठाण संजय पाटील, भारत विकास परिषद डॉ. किर्ती समुद्रे, कच्छ युवक संघ बिपिन शहा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विक्रम पाटील, एन. एस. मुंबई डॉ. विशाल जाधव, चंद्रकांत तांबटकर, मंजुषा भावे, शाम बुंडे, ऍड अमित चव्हाण, स्वप्नीष विचारे, रजनी शाहू, प्रसाद अग्निहोत्री यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.