Breaking News

अलिबाग एसटी स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी

परतीच्या प्रवासात पर्यटक बेहाल

अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग एसटी स्थानकात पर्यटक आणि चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. मे महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. दुसरीकडे उन्हाळी सुटीसाठी आलेले चाकरमानीदेखील परतीच्या मार्गावर आहेत. मांडवा ते मुंबई ही प्रवासी जलवाहतूक सेवा दोन दिवसांपूर्वीच बंद झाली. परिणामी मुंबईला जाण्यासाठी एसटी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे एसटीला मोठी गर्दी झाली असून अलिबाग स्थानक गर्दीने फुलून गेले होते. मे महिन्याचा शेवटचा शनिवार-रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने अलिबागसह, मुरूड, काशीद, नागाव, किहीमच्या किनार्‍यांवर दाखल झाले होते. दोन दिवस मौजमजा करून आज दुपारनंतर ते परतीच्या प्रवासाला लागले. दुसरीकडे मे महिन्याची सुट्टी संपवून चाकरमानी रविवारी (दि. 28) मुंबईला निघाले. मुंबईला जाण्यासाठी जवळचा आणि सोयीचा मार्ग असलेल्या मांडवा ते मुंबई या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक 26 मे पासूनच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रवाशांना एसटीनेच प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अलिबाग एसटी स्थानक प्रवाशांनी फुलून गेले होते. अलिबाग-पनवेल मार्गावरील बसेस देखील वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांना विशेषतः महिला आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागला. एखादी बसस्थानकात लागली की, ती पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडत होती. प्रवाशांच्या तुलनेत एसटी सेवा अपुरी पडते आहे. परिणामी प्रवाशांचे मोठे हाल झाले.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply