Breaking News

जिल्हा कोविड सेंटर अंतिम टप्प्यात

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना खाटांची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांचे अद्ययावत जिल्हा कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे सेंटर सुरू होणार आहे.
जिल्ह्यात 99 हजार 64 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातील 27 हजार 863 जण कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी 23 हजार 929 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तीन हजार 934 जणांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 839 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून या रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथेच कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जिकल विभागात 100 खाटांचे अद्ययावत असे जिल्हा कोविड केंद्र तयार करण्यात येत आहे. 40 खाटा ऑक्सिजन यंत्रणेने, तर 60 खाटा  व्हेंटिलेटर, ऑक्सिजनयुक्त बनविण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून या रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 खाटांच्या कोविड केंद्राचे काम सुरू झाले आहे. लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येईल.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply