मान्यवरांची उपस्थिती; पंतप्रधानांच्या संदेशाचे होणार प्रक्षेपण
महाड ः रामप्रहर वृत्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून शुक्रवारीशुक्रवारी शुक्रवारी (दि. 2) सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जून रोजीदेखील सकाळी 8.30 वाजता किल्ला परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन आहे. शिवाय मुंबईतही गेटवे ऑफ इंडिया येथे 7 जूनपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.