पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 या प्रकाशझोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 30) झाले. या वेळी बोलताना त्यांनी तरुणांसह ग्रामस्थांनाही एकत्र आणण्याचे काम या स्पर्धेमुळे होत असल्याचे प्रतिपादन केले.
न्हावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी भेट देते शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कान्हाशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, न्हावेखाडी क्रिकेट क्लब, रामबाग व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व न्हावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, रोशन ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप नेते चंद्रकांत घरत, म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सी. एल. ठाकूर, माजी उपसरपंच किसन पाटील, देवेंद्र भोईर, तुषार भोईर, माजी सदस्य संजय ठाकूर, प्रकाश कडू, सदाशिव ठाकूर, रूपेश मोकल, सुभाष कडू, नरेश मोकल, माजी नगरसेवक अजय बहिरा, स्वप्नील ठाकूर, सुहास भगत, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, प्रकाश कडू, सुधीर ठाकूर, चेतन ठाकूर, नील ठाकूर, सुभाष कडू, अल्केश बयकर, रोहन म्हात्रे, नरेश कडू, महिला मंडळ अध्यक्ष मिनाक्षी पाटील, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर, सूत्रसंचालक दीपक भरणुके, राजकिरण कोळी, जयेश भोसले, रोशन पाटील, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …