रसायनी : प्रतिनिधी
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील मुदत संपणार्या ग्रामपंचायतींचा मतदार पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून, 20 मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जूनमध्ये जाहीर केला जाणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी जून अखेरपर्यंत मतदान होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. जुलै, सप्टेंबरपर्यंत मुदत संपणार्या व नव्याने स्थापित होणार्या पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे, जांभिवली, कराडे बुद्रुक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायतींची निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांसह आघाड्या, गठबंधन, अपक्ष असे सारेच आपापल्या परीने मतदारांपर्यंत जाण्याकरिता घाईगर्दी करू लागले आहेत. परिसरात सध्या राजकीय रंगढंग पाहावयास मिळत आहेत. जून महिन्यात निश्चितच परिसरात प्रचाराचा धुरळा उडणार, अशी चर्चा आहे.