Breaking News

पोलीस ठाण्यासमोरच महिलांची हाणामारी; तीन महिलांविरोधात गुन्हा

पनवेल : वार्ताहर

कळंबोली पोलीस ठाण्यासमोरच तीन महिलांमध्ये एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी या महिलांविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या तीनही महिला कळंबोली जाधववाडी या परिसरातील आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यासमोरील रोडवर एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यास या महिलांनी सुरुवात केली. दरम्यान, पोलीस ठाण्याबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडाओरड होत असल्याची बाब ठाण्यातील कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच महिला पोलिसांसह इतर पोलिसांनी बाहेर येऊन पाहिले असता महिलांमध्येच चांगली जुंपली असल्याचे, तसेच एक महिला मला जिवंत राहायचे नाही असे मोठमोठ्याने ओरडण्याबरोबरच आपल्या हातातील बाटलीत असलेला कुठलातरी द्रव्य पदार्थ ओतून घेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच महिला पोलिसांच्या मदतीने या सर्व महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply