Breaking News

‘आरटीआयएससी’चे कराटेपटू चॅम्पियन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) कराटेपटूंनी पालघर येथे आयोजित राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल ‘आरटीआयएससी’चे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
निहान्सिकी कराटे आणि स्पोर्ट्स फेडरेशन यांनी 43वी राष्ट्रीय उन्हाळी कराटे सेमिनार चॅम्पियनशीप पालघर केळवा रोड येथे आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, केरळ राज्यातील मिळून 200हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात आरटीआयएससीच्या 35 कराटेपटूंचा समावेश होता.
स्पर्धेत आरटीआयएससीच्या कराटेपटूंनी 15 सुवर्ण, 18 रौप्य आणि 28 कांस्यपदके जिंकून पहिल्या क्रमांकाचा चषक पटकाविला. जीविका पाटील, सोहम डोलासिया, निमिष चौधरी, उत्कर्ष नारायण हे ब्लॅक बेल्ट ही परीक्षा उत्तीर्ण झाले. या सर्वांना प्रशिक्षक राकेश तिवरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी कराटेपटूंचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अमोघ ठाकूर, श्यामनाथ पुंडे, प्रणित गोंधळी आदी उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply