कलाकार, मान्यवरांची सोहळ्यास उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
झी मराठी महाराष्ट्र सखी आणि जी. एस. फाउंडेशनच्या वतीने उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम पनवेल शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकताच मोठ्या उत्साहात रंगला. या सोहळ्याला माजी उपमहापौर चारुशीला घरत आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांनी भेट देत कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, नीता माळी, भाजप भटके विमुक्त महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, महिला मोर्चा सदस्य सरोज मोरे, अंजली इनामदार, अॅड. प्रमिला धौल, अनिता भोर, पल्लवी पाटील, सुजाता पाटील, प्रभा सिंह, वैशाली गलांडे, युनियन बँक ऑफ इंडिया मुंबईचे सहाय्यक महाप्रबंधक रामजीत सिंह, मनोज पत्की यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.