Breaking News

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ऑईल टँकरला आग; जीवितहानी नाही

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनला खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर ऑइल टँकरच्या केबिनला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून टँकर पुलाखालून पुढे नेत साइटपट्टीवर उभा केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला व जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी (दि. 18) 7 वाजण्याच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच, खोपोली अग्निशमन दल, टाटा स्टीलची फायर ब्रिगेड, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, आणि बोरघाट वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. 15 मिनिटात यंत्रणांना आग विझवण्यात यश आले. सुदैवाने केबिनची आग ऑईल असणार्‍या टँकपर्यंत पोहचली नाही अन्यथा पुन्हा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.

Check Also

वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीच्या विजयाचा विचार करा- आमदार प्रशांत ठाकूर

अलिबाग (प्रतिनिधी): मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले …

Leave a Reply