Breaking News

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उरणमध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण

उरण : वार्ताहर

आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून उरण नगर परिषदेसाठी घेतलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. तसेच तालुका भाजपच्या वतीने शक्ती केंद्रप्रमुख बैठक तेरापंथ वाणी आळी येथे झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन लाभले. उरण तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुखांचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. असेच काम करीत राहा, असे विचार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. भाजपला बळकट करण्यासाठी सर्वांनी अशीच चांगल्या प्रकारे कामे करीत राहावे, असे विचार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडले. या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, महिला तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, सरचिटणीस निर्मला घरत, रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत, उत्तर रायगड जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष सुधीर घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेविका आशा शेलार, रजनी कोळी, दमयंती म्हात्रे, स्नेहल कासारे, जानव्ही पंडीत, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका युवक अध्यक्ष शेखर पाटील, हितेश शाह, उद्योजक राजेंद्र पडते, मदन कोळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply