Breaking News

भाजप सरकारचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर ठेवणार-आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये संयुक्त मोर्चा संमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या नऊ वर्षांत केंद्रातील भाजपच्या सरकारमुळे देशाचा सातत्याने विकास होत असून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या नार्‍यामुळे देश आज उत्तमोत्तम प्रगती करीत आहे. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचे प्रगतीपुस्तक आपल्याला जनतेसमोर मांडायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी (दि. 18)संयुक्त मोर्चा संमेलन मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे आयटी सेलचे प्रमुख सतीश निकम, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश बिनेदार, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग पटवर्धन, अविनाश कोळी, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कामगार संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, उरण तालुका महिलाध्यक्षा राणी म्हात्रे, योगिता घरत, शिल्पा म्हात्रे, प्रतिभा भोईर, जसीम गॅस यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply