उरण : वार्ताहर
युईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालक पारंपारिक वेषभूषेत जमले होते. युईएस संस्थेच्या ट्रस्टी मेंबर्सनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घातले, त्यानंतर पालखीतील शिवरायांच्या मूर्तीसही पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर ढोलताशे व लेझिमच्या लयबद्ध वाद्यवृंदासह महाराजांच्या पालखीची मिरवणूक युईएस स्कूल अॅण्ड कॉलेजच्या दिशेने निघाली. सर्व विद्यार्थी व पालकांनी पारंपरिक वेष परिधान केला होता. त्यातील काही विद्यार्थी जिजाऊ व बाल शिवाजीच्या वेशभूषेत आले होते. या सर्व विद्यार्थांची पालखीतील शिवरायांच्या मूर्तीची वाजत गाजत विमला तलाव ते पालक मैदान अशी भव्य मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत युईएस संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, खजिनदार विश्वास दर्णे, विश्वस्त सदस्या व माजी प्राचार्या स्नेहल प्रधान, माजी अध्यक्ष व सदस्य अॅड. राजेंद्र भानुशाली, सिनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स, सिनियर कॉलेजचे एचओडी, पीटीए मेंबर्स, पालकगण, स्कूल, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी फळे वाटप
नवी मुंबई : शिवजयंतीनिमित्त मानखुर्द येथील शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टचे वृद्धाश्रम आणि वाशीच्या अनाथ बालक तसेच डिझायर सोसायटीतील अनाथ एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.