Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पुढारी जीवन गौरव पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पुढारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दै. पुढारी पनवेल-नवी मुंबई सन्मान सोहळा 2023चे पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.
पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार (दि. 18) रोजी पुढारी पनवेल-नवी मुंबई सन्मान सोहळा 2023 आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, दै. पुढारीचे संपादक शशिकांत सावंत, अमित तळेकर व जयंत धुळप उपस्थित होते. या वेळी राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, तंत्रज्ञान, बांधकाम व प्रशासकीय क्षेत्रात भरारी घेणार्‍या कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी ते पुढे म्हणाले, पत्रकारांनी केलेला सत्कार महत्वाचा असतो कारण त्यांची नजर सामाजिक व राजकीय कामांवर असते. महापालिका आयुक्त गणेश देशमुख व गटविकास अधिकारी संजय भोये यांचा सत्कार म्हणजे त्यांची जबाबदारी वाढवणारा आहे. आता त्यांनी आपल्या नंतर असे सत्कार घेणारे अधिकारी तयार करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असल्याचे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की तुमचा आमदार शांत व हुशार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर असल्याने आपण भाषण करणार नाही असे सांगितले, पण मी भाषणाला येत असताना इतर नेते माझे कौतुक करा सांगतात यांनी मात्र मला सांगितले कार्यक्रम संपला की मला पाच मिनिटे द्या. पनवेल मध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवायला हवा यावरून त्यांची कामाबद्दलची तळमळ दिसून येते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले, मी नेहमी पडलेली जबाबदारी पूर्ण करणे कर्तव्य समजतो. त्यामुळे मला थोरामोठ्यांचे आशीर्वाद, प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच आज हा पुढारी जीवन गौरव पुरस्कार मिळाला. दै. पुढारीने
पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद दिले. पालकमंत्री उदय सामंत व आपले जुने संबंध आहेत. ‘रयत’मध्ये ही आम्ही दोघे काम करीत आहोत. ते मला धाकट्या भावासारखे असून प्रत्येक काम मानापासून करतात त्यांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे, याबद्दल आनंद आहे.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply