Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी उरण तालुका पत्रकार संघाचा ठराव

उरण : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धंनजय गोंधळी यांनी केली. या मागणीस उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली. लोकनेते दि. बा. पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या जागेवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील प्रकल्पग्रस्तांकडून जोर धरू लागली आहे. त्यासाठी वेळप्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे, कारण येथील प्रकल्पग्रस्तांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. या वेळी ते कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते. त्यामुळे अशा लोकनेत्याचे नाव विमानतळाला देण्यास हरकत नाही. या बैठकीस पत्रकार संघटनेचे अध्यक्ष घन:श्याम कडू, पालू भिंडे, संजय गायकवाड, जे. एस. घरत, रा. ऊ. म्हात्रे व राजेंद्र नाईक आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply