Breaking News

अल्पवयीन मुलीचे नग्न विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी मागणारा अटकेत

पनवेल : वार्ताहर
स्नॅपचॅट अँपवरून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख व संपर्क करून तिला तिचे नग्न फोटो व व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त करून नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या आरोपीस पनवेल तालुका पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे.
पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीची तिचे आईचें मोबाईल फोनवरून सिराज चौधरी या नाशिक येथे राहणान्या इसमासोबत स्नॅपचॅट वरून 6 ते 7 महिन्यापुर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिचे सोबत वॉटस अ‍ॅपवर चॅटींग करून ती अल्पवयीन असल्याचे माहीती असताना देखील तिचे आई-वडीलांना त्यांचेतील संबंधाबद्दल सांगतो अशी धमकी देवुन तिला तिचे न्युड अथवा नग्न फोटो व व्हिडीओ पाठवण्यास प्रवृत्त केले. सिराज चौधरी यास तिचे न्युड फोटो व व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर त्याने सदरचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन सदर अल्पवयीन मुलीस तिचे राहते घराच्या खाली बोलावुन जबरदस्तीने तिचा हात पकडुन तिचेसोबत सेल्फी काढला. व त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो व व्हिडीओ तिला तिचा आतेभाऊ यांना पाठवुन सदरचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन त्यांचेकडे 50 हजार रूपये रक्कमेची मागणी केली तसेच सदर अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर फेक आयडी बनविला.
या घटनेबाबतची माहीती अल्पवयीन मुलीच्या आत्येभावाने अल्पवयीन मुलगी तिचे आई-वडीलासह अतिशय भयभित स्थितीत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे येथे आली व त्यांनी याबाबत पोलिसांना माहीती दिली. पनवेल तालुका पोलिसांनी सिराज चौधरी (रा. नाशिक) यांचेविरूध्द विनयभंग, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद केला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी सिराज अहमद आबीद अली चौधरी (वय 19) याचा सहभाग निष्पन्न केला. पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने विनाविलंब नाशिक येथे जावुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत स्थानिक पोलीसांची मदत घेवुन आरोपी सिराज चौधरी याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply