Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल ग्रामीणमधील विकासकामांचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तालुक्यातील विहीघर, वाजे आणि चेरवली येथे विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.6) झाला. यामध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण, नाला बांधणे आणि स्मशानभूमीच्या कामांचा समावेश आहे.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पनवेलमध्ये विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या आमदार निधीतून विहीघर येथील लक्ष्मीनगर गेटपासून ते लक्ष्मीनगर बिल्डिंगपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण (चार लाख 19 हजार 978 रुपये) आणि बापदेव मंदिरापासून ते डी टाईपपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (आठ लाख 43 हजार 535 रुपये), तर जिल्हा नियोजन निधीतून विहीघर गावकडे जाणार्‍या रस्त्यावर सात लाख 99 हजार 990 रुपयांच्या निधीतून मोरी बांधण्यात येणार आहे. याचबरोबर आठ लाख रुपयांच्या आमदार निधीतून चेरवली येथे स्मशानभूमी आणि जिल्हा परिषेदेच्या 10 लाख रुपयांच्या सेस फंडातून वाजे येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
भूमिपूजन समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर फडके, मुकेश फडके, हभप दिनकरमहाराज पाटील, अनंता पाटील, मिन्नत फडके, गजानन पाटील, गजानन संतु पाटील, नरेश फडके, संतोष हरड, जगदीश पाटील, सागर पाटील, सोमनाथ फडके, अनिकेत फडके, मनोज फडके, ओमकार फडके, महेश फडके, स्वप्नील पाटील, अभिनय पाटील, संतोष शेडगे, संदीप कुलाल, संदीप उधाणे, राजेंद्र कोरडे, रवींद्र पाटील, रमेश फडके, हभप विष्णूमहाराज पाटील, ऋतिक फडके, रोहित पाटील, आर्यन फडके, सौरव पाटील, करण पाटील, हभप नामदेव पाटील, वाजे सरपंच मदन पाटील, उपसरपंच गणेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राघव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रेवण पाटील, माजी सरपंच राजा भोईर, पदू वाघ, महादू आंबे, काळराम भुराडा, राजा भालेकर, मारुती भालेकर, बाळाराम भालेकर, यशवंत बुवा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply