Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आसूडगाव शाळेत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात येतो. त्या अंतर्गत पनवेलजवळील आसुडगाव येथील जि. प. शाळेत भाजपचे तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 21) विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार यंदा मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली असून आसुडगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत शेळके, मुख्याध्यपिका जयश्री मुंढे, मनोहर म्हात्रे, रमेश नाईक, अशोक हुद्दार, बाळाराम नाईक, अक्षय हुद्दार, किशोर नाईक, मोहन खटकर, महेश म्हात्रे, सत्यवान पाटील, डॉ. संतोष आगलावे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे आभार मानण्यात आले.

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply