Breaking News

मावळमधील जाधववाडी धरणात बुडालेल्या सहा जणांपैकी तीन मृत्युमुखी

मावळ ः प्रतिनिधी

उन्हाळी सुट्टीनिमित्त नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यातील उर्वरित तिघांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते.प्रशील आढाव (7), अनिल कोळसे (58) आणि प्रितेश  आगळे (32, तिघेही रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील गायकवाड यांच्या घरी आलेले हे पाहुणे उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काही जण धरणाच्या पाण्यात उतरले असता अनिल कोळसे यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी मागे उभे असलेल्या दादासाहेब गायकवाड व प्रशिल आढाव यांना पकडले आणि ते दोघेही पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी प्रितेश आगळे यांनीही पाण्यात उडी मारली. त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संगीता गायकवाड आणि उत्कर्ष गायकवाडही बुडू लागल्याने नातेवाइकांनी आरडाओरडा सुरू केला होता.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply