Breaking News

मोटरसायकल रिक्षाच्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जखमी

पनवेल : वार्ताहर

भरधाव वेगात असलेल्या केटीएम मोटरसायकलची रिक्षासोबत झालेल्या धडकेमध्ये मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

केटीएम मोटरसायकलवरील आकाश मोहिते याने त्याच्या ताब्यातील केटीएम मोटरसायकल रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून रात्री 1 च्या सुमारास अमरधान स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर पनवेलकडून कळंबोलीकडे जाणार्‍या रस्त्यावर रिक्षा (एमएच-46-बीडी-0443) ला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटार सायकलवरील अंबर मोहिते हा गंभीररित्या जखमी होवून जागीच मृत्यू पावला.

रिक्षाचालक महादेव गायकवाड व केटीएम चालक आकाश मोहिते हे जखमी झाले आहे. जखमींवर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply