Breaking News

खोपोली येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर

खोपोली : प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ खोपोली ऑल फोर आईज नेत्रालय व नवतरुण मित्र मंडळ चिंचवली शेकीन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवली शेकीन व परिसरातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 14) स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक शाळा क्रमांक 9 येथे करण्यात आले होते.

या शिबिरात 81 शिबिरार्थींनी भाग घेतला, यामध्ये 14 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन नगरसेविका वैशाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव, लायन अध्यक्ष महेश राठी, सहसचिव संत्रीता पिल्ले, खजिनदार अल्पेश शाह, अजय पिल्ले, नारायण कट्टी, रमेश पाटील, सुजित पडवळकर, जितेंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रोकडे, विनोद जाधव, संदीप गंभीर, प्रसाद जाधव, पवन जाधव, दीप जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply