Breaking News

दिव्यांग व कुष्ठरुग्णांसाठीच्या निधीत वाढ केल्याबद्दल भाजपचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांग तसेच कुष्ठरुग्णांसाठी निधीत वाढ केल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांचे शिवाजी कांबळे, के. बी. सवडे, संभाजी वाघमारे, रेश्मा कांबळे, अशोक आंबेकर आदींनी आभार व्यक्त केले.

दिव्यांग लोकांची पनवेल महापालिकेच्या क्षेत्रातील संख्या 1500 ते 1600 इतकी आहे आणि दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. अशा गरीब गरजू लोकांना महापालिकेकडून शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी मदत होणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेता भाजपने महापालिकेच्या सभेत दिव्यांगांना दीड कोटींची वार्षिक मंजुरी दिली. तसेच कुष्ठरुग्ण कल्याण निधीमध्ये दरवर्षी दहा लाखाच्या तरी तरतूद करण्यात आली. यासाठी दिव्यांग व कुष्ठरोग बांधवांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले.

या वेळी नगरसेविका रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply