Breaking News

रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट

अलिबाग : प्रतिनिधी
हवामान विभागाकडून 6 जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दरडग्रस्त, पूरप्रवण, खाडीलगत सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास धाडसाने वाहने पाण्यातून चालवू नये. मासेमारीसाठी खाडी, तलाव, समुद्रात जाऊ नये. सर्व शासकीय यंत्रणांनी आपल्या विभागांच्या यंत्रसामुग्री मनुष्यबळासह तत्पर ठेवाव्यात. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळचे पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्षाशी 02141-222097 या टोल फ्री नंबरवर 112/1077 आणि जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी 02141-228473 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीच्या विजयाचा विचार करा- आमदार प्रशांत ठाकूर

अलिबाग (प्रतिनिधी): मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले …

Leave a Reply