पेण तालुक्यात मोदी @ 9 अभियान
पेण : रामप्रहर वृत्त
पेण तालुक्यात मोदी ऽ 9 अभियानांतर्गत घर घर चलो मोहीम हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरू करण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी सोनखार येथे बोलताना केले.
मोदी 9 घर घर चलो अभियानाला हमरापूर विभागात उर्नोली, सोनखार, कळवे येथून सुरुवात पंतप्रधान किसान योजना, केंद्रीय विकास योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अशा अनेक योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून होत आहेत. त्यांच्या कामाचा हा वसा येथील सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तो घरोघरी पोहचण्याचा अभियान या ठिकाणी चालू झाले आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या गावात जाऊन आपण मिस कॉल द्यायचा आहे. असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी सांगितले.
पेण तालुक्यात घर घर चलो अभियानाला हमरापूर विभागातील उर्नोली येथून सुरुवात करण्यात आली. उर्नोली सोनखर, कळवे येथे हे अभियान राबविण्यात आले. या वेळी पेण विधानसभा संयोजक वैकुंठ पाटील, माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम म्हात्रे, कळवे सरपंच दिलीप म्हात्रे, जोहे माजी सरपंच काशिनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस वंदना म्हात्रे, पेण तालुका सरचिटणीस स्नेहल सावंत, तालुकाध्यक्ष तन्वी पाटील, शर्मिला वैकुंठ पाटील, नरेंद्र पाटील, हरिश्चंद्र डंगर, गौर्या पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम मोदी 9 जनसंपर्क अभियानमार्फत भारतीय जनता पार्टीचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संयोजक वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हमरापूर विभागातील गावागावात घर घर चलो अभियाना अंतर्गत सुरू आहे. या वेळी शर्मिला वैकुंठ पाटील यांनी, भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशामध्ये अमूल्यतुल्य बदल घडवून आणले आहेत. आपला भारत देश हा वेगवेगळ्या स्थानी, जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे. आपल्या सर्व हिंदूंच्या मनातील जे स्वप्न होतं आपलं राम मंदिराचं ते सुद्धा मोदीजींच्या कार्यकारिणीत आपण पूर्ण होताना पहात आहोत. केंद्र सरकारच्या योजना गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन पोहचण्यासाठी हे अभियान असल्याचे सांगितले. या वेळी कौसल्याताई पाटील यांनीही या अभियानाचे महत्व सांगितले.