अवघ्या दहा मिनिटांमध्ये सोनसाखळी चोरांची दोन ठिकाणी चोरी
पनवेल : वार्ताहर
चैन स्नॅचींग करणार्या लुटारूंनी खारघरमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये दोघांच्या अंगावरील सुमारे 92 हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. खारघर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
खारघर सेक्टर 7 मध्ये राहणार्या विमल झरेकर (65) या दरदिवशी सायंकाळी खारघरमध्ये वॉकींग साठी जातात. नेहमीप्रमाणे विमल झरेकर आपल्या सोसायटी लगतच्या गार्डनमधून वॉकींगकरून घरी परतत असताना समोरुन मोटारसायकल वरुन आलेल्या दोघा लुटारुंनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचले. यावेळी 37 हजार रुपये किमतीचे अर्धे मंगळसूत्र लुटारुंच्या हाती लागले, तर उर्वरित मंगळसूत्र विमल झरेकर यांच्याकडे राहिले.
या वेळी विमल झरेकर यांनी आरडा-ओरड केली. मात्र, तोपर्यंत दोघे लुटारु झामा स्वीटस् चौकाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर काही वेळातच सदर लुटारूंनी खारघर सेक्टर 27 मध्ये राहणार्या आणि सेक्टर 21 मधील ग्रामविकास भवन समोरील रस्त्याने पायी चालत जाणार्या हर्ष मनोज डिंग्रा (19) या तरुणाच्या गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे 55 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले. सदर घटनेत दागिने लुटले गेलेले विमल झरेकर आणि हर्ष डिंग्रा दोघेही काही अंतराने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार तक्रार देण्यासाठी पोहोचले. या दोघांचे दागिने लुटणारे आरोपी एकच असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …