पनवेल : रामप्रहर वृत्त
आपल्या समाजाला पद्मश्री राम नाईक यांच्यासारखे एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या रूपाने आपल्या संघटनेच्या आणि समाजाच्या मागण्यांची पूर्तता नक्कीच होत असते, परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज भासेल त्या त्या वेळेस मी आपल्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 29) अधिवेशनात दिली.
महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कुष्ठपीडित व्यक्तींचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अधिवेशनाला माजी राज्यपाल पद्मश्री राम नाईक आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात कुष्ठ वसाहतीतील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यां चा तसेच महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या माजी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनास माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, अपाल अर्थात कुष्ठरुग्ण प्रभावित व्यक्तीच्या संघटनेच्या अध्यक्ष मायाताई रनवरे, शांतिवनचे उदय ठकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश प्रोग्राम ऑफिसर सचिन पाटीदार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वारुळे, महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, सचिव अशोक अंबेकर, उपाध्यक्ष संतोष गाडेकर, खजिनदार शफी शेख आदी उपस्थित होते.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …